शरद पवार ग्राम समृद्धी योजना (sharad pawar gram samridhi yojana form)
काय आहे योजना ?
शरद पवार ग्राम समृद्धी योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यास सुरवात. ही योजना राज्य सरकारची असून ग्रामीण भागातील पात्र लाभर्थ्यांना रोजगार हमी योजनेतून लाभ दिला जाणार आहे.
यामध्ये चार वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश, योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे:
📌 अकुशल खर्च – रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के )
📌 कुशल खर्च – रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के )
📌 एकूण – रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के )
🎯 शेळीपालन शेड बांधणे:
📌 अकुशल खर्च – रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के)
📌 कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के)
📌 एकूण – रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के)
🎯 कुक्कुटपालन शेड बांधणे:
📌 अकुशल खर्च – रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के)
📌 कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के)
📌 एकूण – रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के)
🎯 भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग:
📌 अकुशल खर्च – रु. 4,046/- (प्रमाण 38 टक्के)
📌 कुशल खर्च – रु. 6,491/- (प्रमाण 62 टक्के)
📌 एकूण – रु.10,537/- (प्रमाण 100 टक्के
त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा उद्देश आहे.
या कामांसाठी आवश्यक असणारे ६०:४० अकुशल-कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांच्या जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड, इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध होतील, असा योजनेचा उद्देश आहे.
हे पण वाचा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी वाचा
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना