कोविड १९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षापासून राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोविड-१९ महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील अनेक नागरीकांचे निधन झाले आहे.
अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील बालके अनाथ झाली आहेत.
तर काही घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून अनेक महिला विधवा झालेल्या आहेत.
पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे संगोपन करणे तसेच विधवा महिलांचे योग्य पुनर्वसन करुन त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधून भविष्याविषयी त्यांना आश्वस्त करणे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करुन देणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे.
Mission Vatsalya Yojana Maharashtra
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावून अनाथ झालेल्या बालकांना एकरकमी 5 लाख रुपये इतके अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे तसेच त्यांना बालसंगोपन योजनेचा दरमहा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.
सदर अनाथ बालकांचे शिक्षण शासकीय संस्थांमध्ये झाल्यास त्यांचे शैक्षणिक सुल्क शासनाने माफ केले असून त्यांची खाजगी शाळेतील शैक्षणिक शुल्क अदा करण्याची सुविधा स्वयंसेवी संस्थांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे कोविड-१९ मुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.
त्यामुळे एकल/ विधवा महिला आणि अनाथ बालके यांच्या कुटूंबियांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारीत “Mission Vatsalya Yojana” ही योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
या मिशननुसार गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके गाव, शहरातील एकल, विधवा महिला, अनाथ बालकांच्या कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील. तसेच विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे सादर करतील.
- कुटुंब निवृत्तीवेतन योजना
- शिधापत्रिका
- वारस प्रमाणपत्र
- LIC किंवा इतर विमा पॉलीसीचा लाभ
- बॅक खाते
- आधार कार्ड
- जन्म/मृत्यू दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- मालमत्ता विषयक हक्क
- संजय गांधी निराधार योजना
- राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना
- श्रावण बाळ योजना
- बालसंगोपन योजना
- अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व फी
- घरकुल
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना,
- विधवा निवृत्ती वेतन योजना, अपंग निवृत्ती वेतन योजना
- शुभ मंगल सामुहिक योजना
- अंत्योदय योजना
- आदिवासी विकास विभागामार्फत येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना
- कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना
मिशन वात्सल्य योजना शासन निर्णय
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील कृती दलाची (Task Force) व्याप्ती वाढवून शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा या महिलांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी कृती दलावर सोपविण्यात आलेली आहे.
कोविड १९-या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता करुन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित “मिशन वात्सल्य” योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आलीआहे.
कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या
महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या “Mission Vatsalya Yojana” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.
योजनेचे नाव | Mission Vatsalya Yojana |
योजनेचे कार्यक्षेत्र | संपुर्ण राज्य |
जारी करणारा विभाग | महाराष्ट्र शासन |
लाभ | एकरकमी 5 लाख रुपये |
लाभार्थी | एकल/ विधवा महिला आणि अनाथ बालके |
सेवा | 24 योजना |