DAY-NRLM अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी (SHGs) विना तारण किंवा हमीमुक्त कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली आहे
महिला बचत गट कर्ज योजना 2022
भारतीय रिझर्व्ह बँकेने दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन DAY-NRLM अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांसाठी (SHGs) तारण किंवा हमीमुक्त कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली आहे .
भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत अधिसूचित काढली आहे.
DAY-NRLM (डीएवाय-एनआरएलएम) ही गरीब, विशेषतः महिलांसाठी मजबूत संस्था उभारून गरिबी निर्मूलनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे. याद्वारे या संस्थांना सर्वसमावेशक आर्थिक सेवा आणि उपजीविकेचा प्रवेश मिळतो
आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, बचत गटांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही हमी लागणार नाही आणि त्यांच्याकडून कोणतेही मार्जिन आकारले जाणार नाही. याशिवाय कर्ज मंजूर करताना बचत गटांना कोणतीही ठेव देखील मागितली जाणार नाही.
महिला बचत गटाचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत फक्त nrlm मार्फत कर्जसाठी अर्ज करायचा आहे. ( Bank Loan )
महिला बचत गट योजना 2021-2022
महिला बचत गटांना राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकाकडून कर्जपुरवठा केला जाणार आहे.
या कर्जाचा वापर करून ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होता यावे म्हणून ग्रामीण महिला बचत गट यांना बँकेकडून पतपुरवठा केला जाणार आहे.
ज्या महिला बचत गटांनी, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने व्यवसाय सुरू केला आहे, अशा गटांना प्रोत्साहन देण्याकरता या निर्णयाचा फायदा होईल. ( Insurance )
हे ही वाचा
प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी 2021
गाई गोठा शेळीपालन योजना अर्ज नमूना