Type Here to Get Search Results !

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी 100% अनुदान . 100% grant for Bhausaheb Fundkar Horticulture Scheme

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी 100% अनुदान


राज्यामध्ये सन 1990 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबनवण्यात आली असून सदर योजनेअंर्तगत अर्थसहाय्य देणे टप्याटप्याने बंद केलेआहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंर्तगत “जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूनित जाती-जमाती शेतकरी” फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मयादेपयंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये80 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरत आहेत.

त्यामुळे राज्य सरकार मार्फत भाऊसाहेब फुं डकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून राज्यात राबनवण्यात येत आहे.

या योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50 % दुसर्‍या वर्षी 30 % आणि तिसर्‍या वर्षी 20 % देण्यात येणार आहे .

पात्रता 

  वैयक्तिक शेतकरी ( स्वतच्या नावावर 7/12 असणे आवश्यक आहे .)

अल्प अत्यल्प महिला व दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. 

या योजनेत शेतकरी कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त 6 हे. क्षेत्र मर्यादेत लभ घेऊ शकतो. 

 लाभाथी जर संयुक्त खातेदार असेल तर  त्याच्या नावे असलेल्या क्षेत्राकरीताच लाभ देण्यात येईल

आवश्यक कागदपत्र 

7/12 व 8 अ उतारा 

हमीपत्र 

संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र

जातीचे प्रमाणपत्र ( अनुसूचीत जाती व जमातीसाठी )

 ठिबक सिंचन अनुदान

  लाभार्थ्यास फळबाग लागवडीकरीता ठिबक सिंचन  संच बसवणे अनिवार्य आहे.  ठिबक सिंचन  संचाच्या उभारणीकरीता 100 टक्के अनुदान देय आहे .  फळबाग लागवडीसाठी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी थिबक  सिंचन संचकरीता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत  पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्याकरीता ई- ठिबक प्रणालीवर अर्ज भरुन द्यावेत.

लाभार्थ्याने लावलेली फळझाडे पहिल्या  वषी किमान 80 टक्के व दुसऱया वषी किमान 90 टक्के जगनवणे आवश्यक राहील.  लाभार्थ्यास प्रतिवर्षी देय असलेले अनुदान त्याच्या आधारसंलग्न बँक खात्यावर जमा होईल . . 

 कलमा / रोचा रोपांचा पुरवठा : 

 9.1 फळबाग लागवडीकरीता कलमे/ नारळ रोपांची  निवड लाभार्थ्याने स्वत: करावयाची असून त्यांनी खालीलप्रमाणे रोपवटीकांना प्राधान्य द्यावे.

  •   कृषी  विभागाच्या रोपवाटीका                                                                                                           
  •  कृषी विद्यापीठाच्या  रोपवाटीका
  •   राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित खाजगी रोपवानटका .  
ऑनलाइन आर्ज करा .


Tags